Poetic conversations with Nature

Poetic conversations with Nature
Poetic conversations with Nature

Monday, December 1, 2014

एक संध्या अशी. .

एक संध्या अशी. ...
क्षितिजात रंगली लाल
सूर्य तिच्या भाळावरती
उधळतो रंग गुलाल. .!

एक संध्या अशी. .
ओली सांज जशी,
दूर तो जातांना
वाटेतच गुंतली पीशी..!

एक संध्या अशी. .

रानात गाणी

ही वेळच अशी नितांत लोभसवाणी. ..!

तो धीट, खुळा, नादावलेला अवरोह. .
ती शांत. .कुशीत निवांतलेली आरोही..!

मी जाताच. .वार्‍याने छेडली गर्द रानात गाणी,
मज विचारतो, का गडे आलीस या ठिकाणी. .!

भटकंती. .!


भटकंती. .!
या निसर्गात. .या वृक्षांत... कोणतं संगीत दडलेलं असतं. .?
या डोंगरावरून जमीनीवर झेपावणारया धुवाधार पाण्याला कोणता नाद असतो..?
या दरी-खोरयातून वाहणाऱ्या वार्‍याला कोणती
लय असते. .?
माझं आणि निसर्गाचं नातं असं सुरेल कसं होतं.?
निसर्ग हा असा समेवर येतांना आपल्या मनात एक अनाहत नाद निनादत राहतो. .
हा नाद. .हा निसर्गाचा स्वर. .म्हणजेच सुरेल संगीत का?
ओ बसंती पवन पागल.