Poetic conversations with Nature

Poetic conversations with Nature
Poetic conversations with Nature

Thursday, May 8, 2014

मावळत्या संध्याकाळी, ओली वाळू पायाखाली
लाटांची येई गाज, अन् चढे लाज गाली...

निळ्याशार आकाशात, चांदणे पडावे
चंद्र व्हावे तू, अन् मोहरूनी मी जावे...

मोरपीशी स्पर्श हा रे, दाटून् आला अंगभर
काळजातले काहुर म्हणते, विसाव ना तू क्षणभर...

अशा शांत लाटेवरती, तुझे सूर यावे
सर्व भान विसरूनी मी रे, धुंद धुंद व्हावे...

येवू देना गीत तुझे, एकदा कानी
सैरभैर झाले मन्, तुझ्या आठवणिंनी...

5 comments: