रिमझिमणारा पाऊस तू....
रोजच असतो अवती भवती रिमझिमणारा पाऊस तू…
आठवणीच्या हिंदोळ्यावर भीरभीरणारा पाऊस तू …
ओल्या हिरव्या रानामधले
थेंब दवांचे टिपतांना
फांदीवरल्या रानफूलांचे
गंध गहिरे भीनतांना
धुक्या-धुक्यातून वाट काढता
"ए, बोल ना" कानी कुजबुजतो
अलगद येती श्वास तूझे नी
गंध प्रीतीचा दरवळतो
गुज मनीचे हळवे होते अन्
स्पर्श ओला मोहरतो
हळव्या हळव्या कानगुजांनी
थरथरणारा पाऊस तू ….
रोजच असतो अवती भवती रिमझिमणारा पाऊस तू….
रोजच असतो अवती भवती रिमझिमणारा पाऊस तू…
आठवणीच्या हिंदोळ्यावर भीरभीरणारा पाऊस तू …
ओल्या हिरव्या रानामधले
थेंब दवांचे टिपतांना
फांदीवरल्या रानफूलांचे
गंध गहिरे भीनतांना
धुक्या-धुक्यातून वाट काढता
"ए, बोल ना" कानी कुजबुजतो
अलगद येती श्वास तूझे नी
गंध प्रीतीचा दरवळतो
गुज मनीचे हळवे होते अन्
स्पर्श ओला मोहरतो
हळव्या हळव्या कानगुजांनी
थरथरणारा पाऊस तू ….
रोजच असतो अवती भवती रिमझिमणारा पाऊस तू….
No comments:
Post a Comment